Followers

Tuesday 9 October 2012

रानात भटकताना..


                       गंध फुलांचा गेला सांगुन...    

    पाऊस संपता संपता रानात नुसती रंगीत सौंदर्याची उधळण  होते.रानात  फिरताना एक विलक्षण जादुई 
      दुनिया नजरेत  येते... निसर्गाने हिरव्या धरतीवर जणू रंगीत फुलांची शाल पांघरली असेच वाटते.....
     निरनिराळ्या रंगाची फुले सगळीकडे डोलत असतात...हा रंगाचा बहर पाहण्यासाठी रानात रानवेडे होऊन

       भटकावे लागते,रंगांशी एकरूप व्हावे लागते तर ही  जादूची रंगीत नगरी आपलीशी वाटते ...
                पाऊस  संपल्यावर भिजलेली वनराई आपल्याच रंगात हरवलेली वाटते..चिंब  भिजून  वनराई 
                 अवखळ पणे आपल्याच नादात वाऱ्याशी हितगुज करीत डोलत असते आणि या अवखळ पणात 


                 आपलेही मन चिंब  भिजते... 

No comments:

Post a Comment